Wednesday, December 20, 2023

पंडित प्रदीप मिश्रा यांचा ठाम विश्वास मनुष्याचे कर्म चांगले असेल तर नशीब नक्कीच बदलते



 

अमरावती : कर्म चांगले असेल तर नशीब नक्कीच बदलते. पण आपला विश्वास पक्का असला पाहिजे. त्यामुळे चांगले कर्म करा, पराभव कदापीही होणार नाही, असा ठाम विश्वास आंतरराष्ट्रीय कथा वाचक पंडित प्रदीप मिश्रा यांनी सोमवारी येथे केले.

येथील हनुमान चालिसा चॅरिटेबल ट्रस्ट आणि खासदार नवनीत राणा, आमदार रवी राणा यांच्या वतीने १६ ते २० डिसेंबर या दरम्यान नजीकच्या हनुमान गढी येथे आयोजित शिव महापुराण कथा प्रवचन करताना ते भाविकांशी थेट संवाद साधत होते. बडनेरा येथील अनिल जगताप नामक भाविकाने पंडित मिश्रा यांना माणसाचं नशीब बदलते का? असा प्रश्न विचारला होता. तेव्हा कर्म चांगले असेल तर नशीब बदलते. पण आपला त्यावर विश्वास पक्का असला पाहिजे. विश्वास हाच सर्वात मोठा वृक्ष असल्याची पुष्टीही पंडित प्रदीप मिश्रा यांनी जोडली. हनुमान चालिसा पठण केले म्हणून प्राचीन काळात तुलसीदास जेलमध्ये गेले आजच्या युगात राणा दाम्पत्यांना जेलमध्ये टाकले. पण घाबरू नका, 'महादेव का महाकाल' सोबत असल्यास कोणी काहीही वाकडं करू शकत नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

भ्रमात राहू नका, साधुसंत हे चमत्कार नव्हे तर प्रवचन करतात. त्यामुळे कर्मासंग जिद्द, चिकाटी असेल तर परमात्मा मिळतो, असे पंडित मिश्रा म्हणाले. दरम्यान खासदार नवनीत राणा, आमदार रवी राणा, उद्योजक चंद्रकुमार जाजोदिया आदींनी पंडित प्रदीप मिश्रा यांचे स्वागत करून आशीर्वाद घेतले.



published by_harish mohan rathi_amravati city news


गुरुदेवनगर, शेंदोळा खुर्दला - एकाच रात्री चार घरफोड्या - कुलूपबंद घरांवर चोरट्यांची वक्रनजर

amravaticitynews.com


तिवसा : थंडीत ग्रामीण भागातील परिसरात लवकरच शांतता पसरते. याचाच फायदा घेऊन अज्ञात चोरट्यांनी कुलूपबंद घरांना टार्गेट करणे सुरू केले आहे. तिवसा पोलिस स्टेशनच्या हद्दीत गुरुदेवनगर व शेंदोळा खुर्द येथे एकाच रात्री चार घरफोड्या झाल्याची घटना रविवारी - उघडकीस आली. विशेष म्हणजे चारही घरातील सदस्य बाहेरगावी असल्याने दिवसा रेकी करून मध्यरात्री ही कुलूपबंद घरे फोडण्यात आली आहे.

गुरुदेवनगर येथील नरेंद्र कर्डिले हे - उपचारासाठी बाहेरगावी असल्याने त्यांच्या घरातून चोरट्यांनी रोख दहा हजार रुपये व पाच ग्रॅम सोन्याची अंगठी लंपास केली. तसेच व्ही. टी. - इंगळे यांचे घर फोडण्याचा प्रयत्न - केला असता शेजाऱ्यांच्या सतर्कतेने - चोरट्यांचा डाव फसला.

शेंदोळा खुर्दला येथील धीरज हरिश्चंद्र खैर यांचे घरातील रोख पस्तीस हजार रुपये व विठ्ठल उमप यांची दुचाकी गायब करून अज्ञातांनी लाखोंचा ऐवज लंपास केला. एकाच रात्री चार घरफोड्या झाल्याने ग्रामीण भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले 

-

भाडेकरूसंबंधी आवश्यक माहिती ठेवा

अनोळखी व्यक्तींना घरात प्रवेश न देता वैयवित्तक माहिती देऊ नये, तसेच बाहेरगावी जातांना शेजारच्यांना कल्पना द्यावी. ग्रामीण भागातही खासगी तसेच शासकीय नोकरीत समाविष्ट असलेल्या भाडेकरूंची संख्या भरपूर आहे. तेव्हा घरमालकांनी भाडेकरूसंबंधी माहिती, त्यांचे ओळखपत्र, आधार कार्ड आदींचा तपशील संग्रहित ठेवावा, असे आवाहन तिवसा पोलिसांकडून करण्यात आले.

शेंदोळा खुर्दला येथील धीरज हरिश्चंद्र खैर यांचे घरातील रोख पस्तीस हजार रुपये व विठ्ठल उमप यांची दुचाकी गायब करून अज्ञातांनी लाखोंचा ऐवज लंपास केला. एकाच रात्री चार घरफोड्या झाल्याने ग्रामीण भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले 

Labels: , , ,

अडीच हजार अंगणवाडी केंद्रांना अद्यापही कुलूप अंगणवाडी सेविकांच्या संपाचा फटका



अमरावती : मानधन वाढीसह इतर विविध मागण्यांसाठी अंगणवाडी सेविका, मदतनीस यांनी राज्यव्यापी संप पुकारला आहे. या संपात जिल्ह्यातील २३१३ अंगणवाडी सेविका व २३१३ मदतनीस, तसेच १४७ मिनी अंगणवाडी सेविका सहभागी झाल्या असून, पंधरा दिवसांपासून जिल्हाभरातील २५०० अंगणवाड्यांना 'टाळे' लागले आहे.

परिणामी, मुलांचा पोषण आहार, गर्भवती माता, स्तनदा मातांचा पोषण आहार, पूर्व प्राथमिक शिक्षण यासह इतर कामे ठप्प झाली आहेत. अंगणवाडी सेविका, मदतनीस यांनी विविध मागण्यांसाठी शासनाला वेळोवेळी निवेदने देऊन मोर्चे काढण्यात आले, तसेच आंदोलनेही करण्यात आली आहेत. मात्र, शासन व प्रशासन पातळीवरून मागण्या मान्य होत नसल्याने अंगणवाडी सेविका, मदतनीस यांनी संपाचे हत्यार उपसले आहे. यात अंगणावीडी सेविका, मिनी अंगणवाडी व सेविका, मदतनीस आदी सहभागी झाल्या आहेत. अंगणवाडी केंद्रात बालके पूर्वप्राथमिक शिक्षणाचे धडे घेतात; परंतु अंगणवाडी सेविका, मदतनीस यांनी पुकारलेल्या संपामुळे या सर्व अंगणवाड्यांना कुलूप लागले आहे. अंगणवाडीतून बालकांच्या कुपोषण मुक्तीसह त्यांना पूर्वप्राथमिक शिक्षण देणे, गरोदर माता, स्तनदा मातांना पोषण आहार देण्याचे काम केले जाते. ही सर्व कामे ठप्प झाली आहेत.


या आहेत मागण्या

अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत कायम करा, अंगणवाडी कर्मचऱ्यांना किमान वेतन २६ हजार रुपये द्या, आहाराचा दर वाढून द्या, अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सामाजिक सुरक्षा योजना लागू कराव्यात.

अंगणवाडी सेविका, मदतनीस अनेक अडचणींचा सामना करत आहेत. आमच्या अनेक मागण्या प्रलंबित आहेत. त्या प्रलंबित मागण्यांसाठी हा संप पुकारला आहे.

-महेश जाधव,जिल्हाध्यक्ष अंगणवाडी बालकवाडी कर्मचारी युनियन



Labels: , ,

Tuesday, December 19, 2023

विदर्भ महाविद्यालय परिसरातून पकडलेल्या बिबट्याला आता त्याचे नैसर्गिक अधिवसात सोडून देण्यात आले

 


AMRAVATI CITY NEWS BREAKING
विदर्भ महाविद्यालय परिसरातून पकडलेल्या बिबट्याला आता त्याचे नैसर्गिक अधिवसात सोडून देण्यात आले


The leopard caught from the Vidarbha college premises has now been released in its natural habitat

Labels: , , ,

जितकी पाऊले चालले, तितक्या अश्वमेध यज्ञाचे पुण्य मिळेल ! पं. मिश्रा यांनी दाखवला भक्तिमार्ग ; शिव महापुराणाचा दाखला




अमरावती दि. 19 : अमरावतीच्या श्री हनुमान गढी येथे आयोजीत पं. प्रदीप मिश्रा यांच्या अंबा अंबेश्वर शिवमहापुराण कथेच्या दुसऱ्या दिवशी पं. मिश्रा यांनी शिव महापुराणाचे दाखले देत भक्तांना भक्तिमार्ग दाखवला. या कथेसाठी दूर-दुरून पायी चालत आलेल्या भक्तांना ते कथास्थळ पर्यंत जितकी पाऊले चालत आले आहेत त्यांना तितक्या अश्वमेध यज्ञाचे पुण्य मिळेल असे त्यांनी सांगिले. शिवलिंगावर एक लोटा जल अर्पित करण्यासाठी तुम्ही आपल्या घरापासून शिव मंदिरापर्यंत जितकी पावले चालत जाल भगवान शिवही तुमच्या तितकेच जवळ येतील असे पं. मिश्रा यांनी सांगितले. श्री हनुमान गढी येथे आयोजीत या शिवमहापुराण कथेला उसळलेल्या लाखो भक्तांच्या गर्दीमुळे आज पर्यंतच्या गर्दीचे सर्व उच्चांक मोडीत निघाले असल्याचे आयोजकांचे म्हणणे आहे.

amravaticitynews.com


आज-काल माणुसकी हि शेअर मार्केट प्रमाणे खाली येत आहे. उंच आकाशात भरारी घेणे हा गुण निसर्गात वावरणाऱ्या पक्ष्यांचा आहे तर दुसरीकडे भरारी घेणाऱ्याला खाली खेचण्याचा गुण माणूस या जातीने विकसित केला आहे. माणूस हा माणसाचे जीवन जगणेच विसरत चालला आहे. परंतु कुठलीच जादूची छडी किंवा कोणतेच महाराज धनवर्षा करू शकत नाहीत. प्रत्येकाला आप-आपले भोग स्वतःच भोगावे लागणार आहेत. त्यामुळे दुःख तुमचे तर तुम्हालाच शिवलिंगावर एक लोटा जल अर्पित करावे लागेल. असे पं. प्रदीप मिश्रा म्हणाले. सनातन धर्म,संस्कृती,हिंदू धर्म रूढी व परंपरा हेच वैश्विक सत्य असून,भक्ती शक्ती चा अनोखा संगम हा केवळ आपल्या धर्मातच बघायला मिळते. भगवान शिव हे देवाधिदेव महादेव असून भक्तांच्या संकट निवारणासाठी शिवआराधना हा अत्यंत सहज सोपा व सरळ मार्ग असून एक लोटा जल हर समस्या का हल हा मूलमंत्र प्रत्येक धर्मप्रेमी व सनातनी भक्ताने अंगीकारणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन यावेळी पंडित प्रदीप मिश्रा यांनी आपल्या प्रवचनातून केले. दुसऱ्या दिवशीच्या या शिवमहापुराण कथेचा समारोप लाखो शिवभक्तांच्या उपस्थितीत महिला सफाई कर्मचारी, स्वच्छता दुत व खासदार डॉ अनिल बोंडे, खासदार रामदास तडस, खासदार नवनीत राणा, आमदार रवी राणा, माजी आमदार दिलीप सानंदा, समाजसेवक चंद्रकुमार जाजोदिया यांचे हस्ते आरती करून झाला.
राजसत्तेला ज्ञान देणे हे संतांचे कर्तव्यच

राजसत्तेला वेळो-वेळी ज्ञान देणे हे संतांचे कर्तव्यच होय. राजसत्तेला जेव्हा-जेव्हा गरज पडली तेव्हा-तेव्हा अनेक संत, तपस्वी आदींनी राजसत्तेला सावरण्याचे, राजसत्तेची ताकद वाढवण्याचे काम केले आहे. शास्त्रातही याचे कित्येक प्रमाण आहेत. आणि आज राजसत्तेला संतांच्या ज्ञानाची व पाठबळाची नितांत गरज असल्याचे पं. मिश्रा यांनी सांगितले.
मला तपोवनेश्वर घेऊन चला

अंबानगरी अमरावतीच्या पावन भूमीत आल्याचे सौभाग्य लाभले हे माझे भाग्य आहे. या पावन भूमीतील तपोवनेश्वर येथे महान तपस्वी संघऋषी यांची शिव आराधना भूमी आहे. मी सर्वत्र भ्रमण केले परंतु आजपर्यंत कधीच तपोवनेश्वर येथे जाण्याचा योग आला नाही. परंतु आता मला तपोवनेश्वरला घेऊन चला अशी जाहीर ईच्छा पं. प्रदीप मिश्रा यांनी व्यक्त केली. यावेळी खा. नवनीत राणा यांनी श्री हनुमान गढी हि तपोवनेश्वर पासून दूर नसल्याचे सांगून त्यांची तपोवनेश्वर दर्शनाची ईच्छा पूर्ण होणार असल्याचे सांगितले.
अतिरिक्त व्यवस्थाही अपुरी पडली

शनिवारी शिवमहापुराण कथेच्या पहिल्याच दिवशी भाविकांची उसळलेली अलोट गर्दी बघता आयोजकांनी रात्रीच अतिरिक्त पेंडॉल, आसन व्यवस्था उभी केली. परंतु रविवारीही उसळलेल्या लाखोंच्या गर्दीपुठे आयोजकांची अतिरिक्त व्यवस्थाही अपुरी पडली. या संपूर्ण परिसरात जिथवर नजर जाईल तिथवर सगळीकडे जेष्ठ नागरिक, महिला, पुरुष, बाल-गोपाल,आबाल-वृध्द शिवभक्तच नजरेस पडत होते.
प्रशासनाने व्यवस्था व सुविधा वाढवावी, नागरिकांनीही द्यावी वाहन सेवा
पं. प्रदीप मिश्रा यांनी कथेला उसळनारी गर्दी, शहरापासून दूर असलेले आयोजन स्थळ बघता भाविकांच्या सेवेसाठी जिल्हा प्रशासनाला येथील सुविधा व सुविधा वाढवण्याचे आवाहन केले. त्याच प्रमाणे कथेला येणाऱ्यांनी व विशेषतः युवकांनीही रस्त्याने पायी येणाऱ्या भाविकांना आप-आपल्या वाहनावर बसवून कथास्थळापर्यंत आणण्याची सेवा देण्याचे जाहीर आवाहन केले.

Labels: , ,

दोन बिबटयाच्या झुंझीत एकाचा मृत्यू !विद्यापीठ परिसरात सापडला मृतदेह


amravaticitynews.com


अमरावती दि. 19 : शनिवारी रात्री विद्यापीठ परिसरातील टेकडीजवळ दोन बिबट आपसात भिडले. या झुंझीत एका नर बिबट्याचा मृत्यू झाला. विद्यापीठ-मार्डी रोड वरील राजुरा पेट्रोल पंप समोरील टेकडी परिसरात मृत बिबट्याचा मृतदेह सापडला. घटनेच्या सूचनेवरून वन विभागाच्या पथकाने मृत नर बिबट्याचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदन केले. अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत त्याचेवर दाहसंस्कार करण्यात आले. मृतक बिबट्या हा भानखेडा परिसरातील असून तो विद्यापीठ परिसरात शिरल्याने विद्यापीठ परिसरातील नर बिबट्याने त्याचेवर हल्ला केला. यातच त्या बिबट्याचा मृत्यू झाला. असा अहवाल वन विभागाने नोंदवला आहे. गेल्या काही महिन्यातील विविध घटनेत आतापर्यंत ७ बिबट्यांचा मृत्यू झाला आहे.

वडाळी वनपरिक्षेत्र अधिकारी वर्षा हरणे यांच्या माहितीनुसार विद्यापीठ परिसरात एक बिबट्याचा मृतदेह दिसून आल्याची माहिती रविवारी सकाळी साडेदहा वाजता वनविभागाला मिळाली. त्यानुसार घटनास्थळी जाऊन पंचनामा केला असता वडाळी वर्तुळातील उत्तर वडाळी बिट, वनखंड 07 मधील मार्डी रोड वरील राजुरा पेट्रोलपंप समोरील टेकडी परिसरात डांबरी रस्ता पासून अंदाजे 100 ते 150 मीटर अंतरावर बिबट (नर) मृत अवस्थेत दिसुन आला. तेथून ५० फूट अंतरावर रक्त सांडलेले दिसले. मृत बिबटची प्राथमिक पाहणी केली असता त्याचे डोक्यावर ओरखडे, जिभ दातामध्ये दबलेली तसेच पंज्यावर व चेहऱ्यावर नखाने ओरडलाच्या खुणा दिसून आल्या. पशुचन विकास अधिकारी (प्रयोग शाळा) डॉ. ए. जे. मोहोड, पशुधन विकास अधिकारी (शल्य चिकत्सालय) डॉ. सागर ठोसर यांनी त्या नरबिबट मृतदेहाची प्राथमिक तपासणी केली. त्या बिबट्याच्या डोक्याच्या आतील भागात जखम झाल्याने त्याचे मेंदूत अतीरक्तस्त्राव झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. बांबू गार्डन परिसरात वनाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत त्याचेवर दाहसंस्कार करण्यात आला.
वन्य प्राण्यांच्या मृत्यूचे सत्रच सुरु
गेल्या काही महिन्यापासून शहरात वन्य प्राण्यांच्या मृत्यूचे सत्र सुरु झाले आहे. काही दिवसाआधीच एक बिबट ठार झाला, काल-परवा छत्री तलाव-भानखेडा मार्गावर एक रानमांजर गाडीखाली आल्याने चिरडल्या गेले तोच आता रविवारी सकाळी आणखी एका बिबट्याचा मृतदेह सापडला. अमरावती जिल्ह्यातील दुसरा क्रमांकाचे वनक्षेत्र असलेल्या पोहरा-मालखेड जंगलात वाढलेल्या मानवी हस्तक्षेपामुळे वन्यजीवांना त्यांचा हक्काचा अधिवास सोडून मानवी वस्तीत येऊन जीव गमवावा लागत आहे. वन्य प्राण्यांच्या या मृत्यू सत्रासाठी येथील निंद्रिस्त्र प्रशाषणच जवाबदार असल्याचा आरोप वन्यजीवप्रेमी निलेश कांचनपुरे यांनी केला आहे.
आणखी किती वन्यजीवांचे बळी घेणार ?
अमरावती शहरालगत असलेल्या वडाळी, पोहरा, मालखेड या प्रादेशिक वनक्षेत्रामध्ये अनेक दुर्मिळ प्रजातीचे वन्यप्राणी आढळून येत असून हे जंगल राखीव वनक्षेत्र म्हणून शासन दरबारी याची नोंद आहे परंतु गेल्या काही दिवसात या ठिकाणी स्थानिक राजकीय लोकांनी उच्छाद मांडल्यामुळे व विकाऊ वन अधिकाऱ्यांमुळे सदर जंगल सद्यस्थितीत स्मशान बनण्याच्या मार्गांवर असल्याचे दिसून येत आहे. जिथे सामान्य नागरिकांना एक झाड तोडल्यास शिक्षा होते त्याठिकाणी वन अधिकाऱ्यांच्या नजरेसमोर हजारो हेक्टर जंगल विनापरवानगी नष्ट करण्यात येत आहे. यामुळे येथील वन्यप्राणी विस्थापित होत असून गेल्या वर्षभरात 7 बिबट्यांचा अनैसर्गिक मृत्यू झाला आहे व अनेक वन्यप्राणी मृत्यूमुखी पडले आहेत. एकीकडे शासन हेच प्राणी वाचविण्याकरिता करोडो रुपये खर्च करीत असल्याचे भासवीत असतांना केवळ पक्षाचे आमदार, खासदार व ताटाखालचे मांजर असलेले अधिकारी आहेत म्हणून कार्यवाही करणार नाही ही भूमिका जर शासनाची असेल तर सामान्य जनतेला न्यायालयाचा दरवाजा ठोठवावा लागेल व यांची मक्तेदारी मोडीत काढावी लागेल अशी भूमिका वन्यजीव अभ्यासक सागर मैदानकर यांनी विषद केली


One died in a fight between two leopards! The body was found in the university premises
All

Labels: , , ,

अयोध्येचे स्वामी सत्येंद्र व हनुमान गढीचे महंत राजूदास महाराज मंगळवारी अमरावतीत !



अमरावती दि. 19 : श्री राम जन्मभूमी अयोध्या येथील बाबरी पतन ते भव्य दिव्य प्रभू श्रीराम मंदिर निर्माण या सर्व घडामोडींचे गेल्या 35 वर्षापासून अग्रणी शिलेदार असलेले स्वामी सत्येंद्रजी तसेच हनुमान गढी अयोध्याचे मुख्य महंत राजू दास महाराज हे मंगळवारी (ता.१९) अमरावतीत येत असून ते श्री हनुमान गढी अमरावती येथे हनुमान चालीसा ट्रस्टच्या वतीने आयोजित शिवमहापुराण कथेला उपस्थित राहणार असल्याचे आयोजक आ.रवी राणा, खा. नवनीत राणा यांनी सांगितले.


श्रीराम जन्मभूमी अयोध्या येथे प्रभू श्री राम लल्ला चे भव्य दिव्य मंदिर व्हावे यासाठी सदा अग्रसर असणारे स्वामी सत्येंद्रजी हे कट्टर हिंदुत्ववादी असून गेल्या 35 वर्षा पासून यासाठी कठीण संघर्ष त्यांनी केला आहे. बाबरी पतन,एका छोट्या तबुंत असलेली प्रभू श्री रामाची मूर्ती ते दिनांक 22 जानेवारी 2024 रोजी होणाऱ्या भव्य दिव्य राम मंदिराचे उद्घाटन यासाठी जे मोजके शिलेदार आहेत त्यापैकी एक स्वामी सत्येंद्रजी आहेत. तसेच महंत राजुदास महाराज हे हनुमान गढी अयोध्या चे मुख्य महंत असून त्यांनीच हनुमान गढी अमरावती येथे स्थापित होणाऱ्या 111 फूट उंच हनुमान मूर्ती स्थापनेसाठी श्री राम जन्मभूमी तसेच हनुमान गढी अयोध्या येथील पवित्र मातीचे कलश आमदार रवी राणा यांना सुपूर्द केले होते. मंगळवारी अमरावतीच्या हनुमान गढी येथे सुरु पंडित प्रदीप मिश्रा यांच्या महापुरान कथेदरम्यान स्वामी सत्येंद्र व महंत राजूदास महाराज यांच्या दर्शनाचा लाभ लाखो भक्तांना घेता येईल असे आमदार रवी राणा,खासदार नवनीत राणा यांनी कळविले आहे.

 

Labels: , , , ,